‘बाजीराव मस्तानी’ हा बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात बाजीरावची प्रमुख भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने त्याच्या मिश्या वाढविल्या होत्या तसेच टक्कलही केले होते. त्याच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. अगदी रणवीरही आपल्या या लूकच्या प्रेमात पडल्याप्रमाणे सर्वत्र मिरवत होता. पण आता चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे प्रमोशनही पूर्ण झालेय. यामुळे आता रणवीरने आपला मिश्यांमधील लूकला अलविदा केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या मिश्या कोणी कापल्या आहेत माहितीय का? तर खुद्द त्याची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोणने.
दीपिका रणवीरच्या मिश्या कापत असतानाचा व्हिडीओ रणवीरने ट्विट केला आहे.

इतकेच नाही तर पूर्ण दाढी केल्यानंतरचा रणवीरचा क्लीन शेव्ह लूकही त्याने ट्विट केला.

Story img Loader