कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडमधली बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापाठोपाठ प्रियांका चोप्रा आणि निक जोनाससुद्धा विवाहबंधनात अडकणार आहेत. याव्यतिरिक्त आता दीपिकाचा कथित एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या प्रसिद्ध पार्श्वगायिका निती मोहनशी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी २०१९ मध्ये निहार आणि निती लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. निती मोहन बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. ‘जब तक है जान’ चित्रपटातील ‘जिया रे’, ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधील ‘इश्क वाला लव्ह’, ‘पद्मावत’मधील ‘नैनोवाले ने’ या गाण्यांसाठी ती ओळखली जाते. तर निहार अभिनेता असून कंगना रणौतच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जानेवारीत या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर निहार लगीनघाईला सुरुवात करणार आहे.

 

निती मोहन, निहार पांड्या

वाचा : अशी झाली होती मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीची ‘दिल चाहता है’साठी निवड

दीपिका तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात निहारला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. पुढे या दोघांचे मार्ग वेगळे झाले. मात्र आताही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं निहारने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone ex boyfriend nihar pandya to marry singer neeti mohan reports