piku-d4‘पिकू’ चित्रपटाच्या यशाचा आनंद सेलिब्रेट करत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणने व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढत बंगळुरूमधील आपल्या घरी भेट दिली. ‘पिकू’ चित्रपटाचा प्रसिद्ध कार्यक्रम आणि ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली दीपिका आपल्या घरी जाऊ शकत नव्हती. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे शनिवारचे चित्रीकरण रद्द झाल्याचे कळताच तिने पहिले विमान पकडून घरी धाव घेतली. आपल्या आई-वडिलांना भेटायला दीपिका एक दिवसासाठी बंगळुरू येथील आपल्या घरी गेली असून सोमवारी ती मुंबईत परतणार असल्याचे दीपिकाच्या प्रवक्त्याने सांगितले. संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात दीपिका आणि रणवीर सिंग एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत. ‘गोलियों की रासलीला : राम-लीला’ या २०१३ मध्ये आलेल्या चित्रपटात ते एकत्र दिसले होते.

Story img Loader