‘रामलीला’, ‘बाजीवराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘पिकू’सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अॅसिड हल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ चित्रपट येणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असून चित्रपटातील लक्ष्मीच्या भुमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
दीपिका पादुकोण हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ‘या चित्रपटात साकारत असलेली मालतीची भूमिका ही माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे’, असं लिहित दीपिकानं हा फोटो शेअर केला आहे.
https://twitter.com/deepikapadukone/status/1110022041950920710
मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे.
मेघना गुलजारसह काम करण्यासाठी दीपिका फार उत्साही आहे. ‘मला फार आनंद होत आहे दीपिका लक्ष्मीची भुमिका साकारणार आहे. तसेच मला विश्वास आहे दीपिका ही भुमिका सुंदरतेने पार पाडेल’असा विश्वास मेघना गुलजारने काही दिवसांपूर्वी मुलाखतीत व्यक्त केला छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे