बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी दीपिकाने (Ask Me Anything Session) च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिचा आलिशान बेडरूम चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
दीपिकाने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी ‘आस्क मी एनिथिंग’ द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी अनेक चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी दीपिकाने पहिल्यांदा तिच्या बेडरूमला फोटो शेअर केला आहे. एका चाहत्याने दीपिकाला विचारलं की कोणत्या ठिकाणी राहायला आवडतं? त्यावर उत्तर देत दीपिकाने तिच्या बेडरूमचा फोटो शेअर करत घरी असं उत्तर दिलं आहे. यावेळी दीपिकाचा आलिशान बेडरून चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. या फोटोत दीपिकाने तपकिरी रंगाचा स्वेटर घातलं आहे. दीपिकाचा बेडरूम अत्यंत साधा आणि उठावदार आहे.
आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनि करणार आवडत्या राशीत प्रवेश, या ४ राशींवर लक्ष्मी देवी करणार धनवर्षाव
नुकतीच दीपिका तिच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर स्पेनहून परतली आहे. शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख सोबत दिसणार आहे. स्पेनमधील शूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.