आपल्या खासगी जीवनात सहसा शांत राहणा-या बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने रुद्रावतार धारण केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने तिच्या कपड्यांवर टिप्पणी केल्यामुळे चिडलेल्या दीपिकाने ट्विटरवरून या वृत्तपत्राचा रविवारी चांगलाच समाचार घेतला.
‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या ट्रेलरच्या अनावरणावेळी दीपिकाने अनैता श्रॉफ अदाजानियाने डिझायन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा गळा फारचं खाली असल्यामुळे दीपिका वृत्तपत्राच्या तडाख्यात सापडली. दीपिकाच्या या बातमीला मीठमसाला लावून तिला पुन्हा वृत्तपत्राकडून हवा देण्यात आली. यावर चिडलेल्या दीपिकाने “होय, मी एक स्त्री आहे आणि मला स्तन आहेत. तुम्हाला काही समस्या आहे का?” असे ट्विट केले. दीपिकाच्या या ट्विटला एका तासात १५००हून अधिक रिट्विटही मिळाले होते. दीपिकाच्या असंख्य चाहत्यांनी आणि बॉलीवूड सेलिब्रेटींनी तिला पाठिंबा दिला आहे.  त्यानंतर ‘फाइंडिंग फॅनी’चा दिग्दर्शक होमी अदाजानियानेही तिला पाठिंबा दर्शवत आपला राग व्यक्त केला. तसेच, रणवीर सिंग आणि अदिती राव हैदरी, दिया मिर्झा, जॅकलीन फर्नांडिझ आणि अन्य काही सेलिब्रेटींनी दीपिकाच्याबाजूने ट्विट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा