बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघंही त्यांचा हटके अंदाज, फॅशनमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतात. या दोघांचे एअरपोर्ट लुक देखील अनेकदा व्हायरल होतात. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 83 हा बहुप्रतिक्षित चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच रणवीर सिंहने ईटी टाईम्सला खास मुलाखत दिली. यावेळी रणवीरला अनेक प्रश्न विचारण्यात आले. “गेल्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत तू पडद्यावर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. एखाद्या अभिनेत्यासाठी विविध पात्र साकारणे आणि या भूमिकांमधून बाहेर पडणे किती कठीण असते?” असा प्रश्न रणवीर सिंहला यावेळी विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “मला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी यशराज यांचा बँड बाजा बारात चित्रपट मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.”

“मी माझ्या कारकिर्दीत संजय लीला भन्साळी, रोहित शेट्टी, करण जोहर, झोया अख्तर, कबीर खान ते शंकर अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ही सर्व इंडस्ट्रीतील मोठी नावे आहेत. या सर्वांच्या चित्रपटांमध्ये मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असून त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या सर्व पात्रांमधून मला पुढील १० वर्षांसाठी उत्साह मिळतो, असेही रणवीर म्हणाला.

विकी कौशलचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी करणार लग्न? स्पष्टीकरण देत म्हणाली…

एक अभिनेता म्हणून मला या पात्रांची तयारी करणे फारसे अवघड वाटत नाही. मला या कामाचा आनंद मिळतो. प्रत्येक चित्रपटाचे पात्र साकारण्यासाठी मी बारकाईने निरीक्षण करतो. या सर्व गोष्टी माझ्यातही बदल घडवून आणतात. याबद्दल माझी पत्नी दीपिका खूप प्रेमाने तक्रार करते की दर ६-८ महिन्यांनी तिला माझ्यात एक नवीन व्यक्ती सापडते. हे बदल आयुष्याला फार मजेशीर बनवतात. याचा एक फायदा म्हणजे तिला (दीपिका) एकाच व्यक्तीचा कंटाळा येणार नाही, असे तो म्हणतो.

“मी अजूनही स्वतःला शोधत आहे की मी नक्की कोण आहे. या पात्रांच्या भूमिकेमुळे आपल्या खाण्याच्या सवयी, स्वभाव, प्रतिक्रिया सगळंच बदलतं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक पात्राला एक बदल होतो आणि दीपिकाला तो बदल फार चांगला समजतो,” असेही रणवीर म्हणाला.