दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहे. पण यादरम्यान तिच्याबाबत एक माहिती समोर आली आहे. सोमवारी (२७ सप्टेंबर) रात्री अचानक दीपिकाला ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. पण दीपिकाला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं हे ऐकताच चाहतावर्ग मात्र चिंतेत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, दीपिकाला सोमवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे तिला शारिरीक त्रास जाणवू लागला. दरम्यान तिला लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. सध्यातरी तिची प्रकृती उत्तम असल्याचं बोललं जात आहे. दीपिकाच्या टीमशी याबाबत संपर्क साधता त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचं ‘पिंकविला’ने म्हटलं आहे.

याआधी काही महिन्यांपूर्वी दीपिकाची प्रकृती बिघडली होती. हैद्राबाद येथे अभिनेता प्रभासबरोबर चित्रीकरण करत असताना तिला हृदयाचा त्रास जाणवू लागला. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. दरम्यान तिला हैद्राबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

दीपिकाच्या हाती सध्या बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये ती काम करताना दिसेल. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone hospitalised in mumbai breach candy hospital last nigh due to uneasiness see details kmd