महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करणारा ‘माय चॉईस’ हा दीपिका पदुकोणचा लघुपट काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला. लघुपटावर अनेक चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया उमटल्या. या लघुपटातील विवाहबाह्य शारीरिकसंबंधाच्या विधानांवरून सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेवर भाष्य करताना दीपिका म्हणाली, ‘माय चॉइस’ लघूपटाच्या माध्यमातून पती-पत्नीच्या नात्यातील व्याभिचारास प्रोत्साहन देण्याचा आपला कदापी उद्देश नव्हता. या लघुपटाविषयी दीपिकाने आपले मौन सोडले असून, नसत्या विवादात लघुपटातील व्यापक दृष्टिकोन दूर्लक्षित झाल्याचे मत तिने व्यक्त केले. गेल्या महिन्यात इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये सूत्रधार म्हणून दीपिकाने आपला आवाज दिला आहे. चांगल्या आणि वाईट प्रतिक्रियांचा मला त्रास होत नाही. परंतु, लघुपटातील काही संवादांचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून, लघुपटाच्या माध्यमातून जो मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या मूळ उद्देशालाच दुर्लक्षित करण्यात आल्याचे ती म्हणाली. व्याभिचाराचे समर्थन करत असल्याचा आरोप आपल्यावर लावण्यात आल्याचे सांगत ती म्हणाली, लग्नसंस्था ही पवित्र आणि सच्चेपणावर आधारित असून, मी व्याभिचाराचे कदापि समर्थन करू शकत नाही. मी कधीही व्याभिचाराचा पक्ष घेतला नाही. अत्यंत पवित्र आणि सच्चाईच्या पायावर ऊभ्या असलेल्या लग्नसंस्थेचे महत्व मी चांगल्याप्रकारे जाणते. प्रामाणिक, विश्वासू आणि निष्ठावान असण्याऱ्यांपैकी मी एक आहे. लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कोणाची बाजू घेत नसून, ज्यांच्यासाठी केवळ हाच मुद्दा आहे ते आपल्या ठिकाणी बरोबर असू शकतात. मी व्याभिचाराचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे ती म्हणाली.

Story img Loader