करण जोहरच्या बहुचर्चित ‘शुद्धी’ चित्रपटासाठी आपल्याला संपर्क करण्यात आल्याचा वृत्ताचे दीपिकाने खंडन केले आहे. असे असले तरी, हा चित्रपट करण्याची तयारी तिने दर्शविली आहे. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली दीपिका या विषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली, या चित्रपटासाठी माझ्याशी कोणीही अजून संपर्क साधलेला नाही. या चित्रपटाबाबत काय घडते आहे, हे निर्मात्यांनाच ठाऊक या विषयी मला काही माहिती नाही. हृतिक रोशन या चित्रपटात काम करत असताना मला नक्कीच या चित्रपटात काम करायला आवडले असते. आता जेव्हा तो या चित्रपटात काम करत नाहीये, तेव्हा या चित्रपटाबाबत काय होत आहे ते मला माहित नसल्याचे ती म्हणाली. चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांच्या निवडीच्या कारणावरून करण जोहरच्या निर्मिती संस्थेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या या आगामी चित्रपटाला विलंब होत आहे. या आधी हृतिक रोशन आणि करिना कपूर ही जोडी या चित्रपटात काम करणार होती, परंतु हृतिकच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला आणि हृतिकला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले. करिना कपूर या चित्रपटाचा भाग आहे का नाही, हे देखील अजून स्पष्ट नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा झाल्यास या चित्रपटात काम करणार का, याबाबत विचारले असता दीपिकाने होकारार्थी उत्तर दिले. ती म्हणाली, हो मी जरूर या चित्रपटात काम करेन, का नाही?… मी भूमिकेला न्याय देऊ शकेन, असे जर करणला वाटत असेल, तर मी जरूर हा चित्रपट करेन. जरी हृतिक हा चित्रपट करत नसला, तरी कोणत्याही अन्य सहकलाकारासोबत मी हा चित्रपट करायला तयार आहे. हे सर्व ते या चित्रपटाबाबत काय निर्णय घेतात, यावर अवलंबून आहे. ‘अग्निपथ’ चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दिग्दर्शक करण मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा