अभिनेत्री दीपिका पदुकोणला बॉलिवूडपेक्षा हटके चित्रपट करायचे आहेत. असे असले तरी, ती हॉलिवूडची वाट धरणार नसल्याचे समजते. हॉलिवूडपटांपेक्षा फ्रेंच अथवा इराणीयन चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा असून, आवडत्या दिग्दर्शकांच्या नावांची निश्चितीदेखील तिने केली आहे. फ्रेंच चित्रपट भारतीय चित्रपटांपेक्षा जास्त सुंदर असल्याचे मत व्यक्त करीत मनाजोगते काही करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्याची इच्छा दीपिकाने मुंबईत पार पडलेल्या एका चित्रपट महोत्सवात बोलून दाखविली. आपण काही इराणी चित्रपट पाहिले असून, ‘प्राइसलेस’ हा आपला आवडता फ्रेंच चित्रपट असल्याचेदेखील ती म्हणाली. या दोन देशांमधील काही दिग्दर्शकांचे काम तिला खूप आवडले असून, ज्या दिग्दर्शकांबरोबर तिला काम करण्याची इच्छा आहे, अशा काही दिग्दर्शकांच्या नावांची निश्चितीदेखील तिने केली आहे. २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘हॅपी न्यू इयर’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सध्या ती व्यस्त आहे.

Story img Loader