थंडीचे दिवस सुरु झालेत तसे प्रेमाचे वारेही जोरात वाहू लागले आहेत असं सध्या म्हणण्यास काही हरकत नाही. बॉलीवूडमधील तथाकथित प्रेमीयुगुल रणवीर आणि दीपिका यांच्याकडे पाहिल्यावर तुम्हीही तसेच म्हणाल.
गेल्याच आठवड्यात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा तमाशा हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या यशानिमित्त दिग्दर्शक इम्तियाज अलीने पार्टी ठेवली होती. या पार्टीत काळ्या रंगाच्या कोटमध्ये एक रुबाबदार देखणी व्यक्ती उपस्थित होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द रणवीर सिंग होता. आपल्या तथाकथित प्रेयसीच्या यशात रणवीर सहभागी झाला यात काही नवल नाही. यावेळी माध्यमांशी बोलण्यात व्यस्त असलेल्या रणवीरकडे दीपिका गेली आणि तिने त्याचे स्वागत केले. दीपिकाने सुंदर हास्यासह केलेल्या स्वागतानंतर रणवीर पुन्हा माध्यमांशी बोलण्यात गुंग झाला. त्याने यावेळी दीपिकाची भरभरून स्तुती तर केलीचं पण तिच्या डोळ्यांत बघत आपल्याला तिचा अभिमान वाटतो असेही तो म्हणाला. त्यानंतर रणवीरला माध्यमांपाशी सोडून दीपिका जात असताना त्याने लगेच आपला गाल पुढे केला आणि दीपिकाने लगेच त्याच्या गालाचे चुंबन घेतले.
दीपिका आणि रणवीरचा बाजीराव मस्तानी १८ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा