उतार-चढाव हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग असतात. बॉलीवूडमध्ये सात वर्षे पूर्ण करणा-या दीपिका पादुकोणलाही कठीण काळाला सामोरे जावे लागले होते. आयुष्यातील संघर्षाच्या काळात संयमी राहणे हेच तुमची गुरुकिल्ली असते असे तिचे म्हणणे आहे.
जर तुम्ही अभिनेत्री असाल तर तुम्हाला उतार-चढाव अशा दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागते. आज माझं करियर खूप चांगल सुरु आहे. पण त्याआधी माझे चित्रपट जेव्हा चालत नव्हते त्यावेळेस मला कठीण वेळेला सामोरे जावे लागले होते. मात्र, तेव्हा मी खूप काही शिकलेही, असे दीपिका म्हणाली. अपयशाला तू कशी सामोरे जातेस असे विचारले असता ती म्हणाली, तुम्ही काहीही करा पण संयम ठेवा, गोष्टी आपोआप घडत जातात हे मी शिकले आहे. ओम शांती ओम चित्रपटाद्वारे दमदार पदार्पण करणा-या दीपिकाच्या चित्रपटांच्या निवडीवर समीक्षकांनी टीका केली होती. मात्र, ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘राम लीला’सारखे हिट चित्रपट देऊन तिने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी न्यू ईयर’नेही तिकीट बारीवर चांगली कमाई केली आहे.

Story img Loader