बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आता ‘फॅशन डिझायनिंग’ क्षेत्रात आपले कसब आजमावून पाहणार आहे.
‘वॅन हुसेन’मध्ये महिलांच्या ‘लिमिटेड एडिशन’साठी काम करणार आहे. वॅन हुसेनच्या सह-निर्मितीने दीपिका आपल्या कल्पनेने नवे डिझायनर्स कपडे तयार करणार आहे. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करण्यासाठी दीपिका उत्सुक आहे. ती म्हणते, मी मला डिझायनर समजत नाही. मी ज्यांना ड्रेसिंगच्या नव्या कल्पना सुचतात पण त्या अंमलात आणता येत नाहीत. त्या अंमलात आणण्यासाठी ज्यांना मदतीची गरज असते अशातली मी आहे. माझ्याकडे काही कल्पना होत्या. त्यानुसार कपडे तयार व्हावेत अशी माझी इच्छा होती.” तसेच जर मला माझ्या कल्पना दुसऱयांसमोर मांडणे आवडते तर, त्या अंमलात आणणाऱयांची मी मदत घेणारच आणि त्यासाठी मला ‘वॅन हुसेन’ या डिझायनिंगची साथ मिळाली असेहा दीपिकाने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone makes her debut as fashion designer