‘पिकू’ चित्रपटात आपल्या वयोवृद्ध आणि आजारी वडिलांची उत्तमरित्या काळजी घेणाऱ्या एका जबाबदार मुलीची व्यक्तिरेखा साकारलेल्या दीपिका पदुकोणसाठी तिची आई प्रेरणादायी आहे. आपली आई कुटुंबाला एकत्र ठेवत असल्याचे दीपिका सांगते. माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची कन्या असलेल्या दिपिकाची बहिण उत्तम गोल्फ खेळाडू आहे. दीपिका, वडील प्रकाश आणि गोल्फ खेळणारी बहिण घरातील या तीनही व्यक्ती आपापल्या क्षेत्रात नामवंत असल्या तरी दीपिकासाठी आई फार महत्वाची असून, तिच्यासाठी आईच आदर्श आहे. आई विषयी बोलताना दीपिका म्हणते, घरातील सर्वांना एकमेकांकडून वेगवेगळ्याप्रकारे प्रेरणा मिळते, परंतु, आईकडून मला सर्वात जास्त प्रेरणा मिळते. ती आमच्या कुटुंबाचा कणा आहे. माझे वडील सेलिब्रिटी आहेत, तर बहीण उत्तम गोल्फपटू आहे. परंतु, आईने प्रसिद्धपासून लांब राहणेच पसंत केले. तिने नेहमी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहण्यात आनंद मानला. कुटुंबात खऱ्या अर्थाने आईच हिरो असल्याचे दीपिकाने सांगितले. आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला ‘वुमन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा