बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच एक व्यावसायिक जाहिरात केली. पण, या जाहिरातीचे विशेष असे की, यात दीपिकाने पहिल्यांदाच आपल्या वडिलांसोबत काम केले आहे.
जाहिरातीत एक खोडकर मैत्रिण दीपिकाच्या घरात तिच्या वस्तू अस्ताव्यस्त करते आणि या मैत्रिणाचा पाठलाग करताना दीपिकाच्या हातात अनवधानाने तिच्या लहानपणीची डायरी हाती पडते. डायरीतून सर्व जून्या आठवणी सर्रररकन तिच्या डोळ्यासमोरून निघून जातात. या आठवणी सतत आपल्यासमोर राहाव्यात यासाठी दीपिका आकर्षक रंगांनी घराच्या भिंती रंगवून त्यावर आपल्या वडिलांसोबतची लहानपणीची काही खास छायाचित्रे लावण्याची व्यवस्था करते. इतक्यात दीपिकाचे वडिल प्रकाश पदुकोण येऊन दीपिकाला सरप्राईज देतात. वडिलांच्या येण्याने दीपिका खूष होते आणि दोघेही भिंतीवर लावलेल्या छायाचित्राकडे पाहून रमून जातात, अशाप्रकारे आठवणींच्या धांडोळ्यात भावनिक साद या जाहिरातीतून घालण्यात आली आहे.

Story img Loader