सध्या लॉस एंजालिसमध्ये ‘xXx 3’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि टेनिस स्टार नोवाक जोकोव्हिच काही दिवसांपूर्वी एकत्रित दिसून आल्याचे वृत्त आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही मोठी गोष्ट असली तरी परदेशी प्रसारमाध्यमांसाठी दीपिका अजूनही ‘अदखलपात्र’ असल्याचेच दिसून आले. यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांनी दीपिका पदुकोणची साधीशी दखलही घेतली नाही. प्रसारमाध्यमांनी तिचा उल्लेख केवळ जोकोव्हिचची महिला सहकारी असा केला. त्यामुळे दीपिकाचे चाहते चांगलेच संतापले आहेत. ‘डेलीमेल डॉट को डॉट युके’ने दिलेल्या वृत्तानुसार दीपिका आणि जोकोव्हिच लॉस एंजालिसमधील एका उच्चभ्रू बारमध्ये एकत्र गेले होते.

Story img Loader