दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील काही इंटिमेट सीनमुळे तिच्यावर टीकाही आली. तर काहींनी दीपिकाच्या अभिनयाचे कौतुक केले. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान नुकतंच दीपिकाची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यात तिने रिलेशनशिप आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणूकीबद्दल खुलासा केला होता.

दीपिकाने त्या मुलाखतीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिची कशाप्रकारे फसवणूक केली, याबद्दल सांगितले होते. यावेळी दीपिका म्हणाली की, “मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते.” ही फसवणूक दीपिकाला सहन झाली नाही. त्यामुळे तिने नाते तोडले. रणवीर सिंगपूर्वी दीपिका पदुकोण रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने काही काळ विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यालाही डेट केले. पण दीपिकाने सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
mamta kulkarni is single says left vicky goswami
प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

“माझ्यासाठी सेक्स म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही. तर त्यात भावनांचाही समावेश होतो. मी रिलेशनशिपमध्ये असताना त्याला कधीही फसवले नाही किंवा भरकटले नाही. जर मी एखाद्याला मूर्ख बनणार असेल, तर मी नातेसंबंधात का असेन? त्यापेक्षा अविवाहित राहणे आणि मजा करणे चांगले आहे. पण सगळ्यांनाच असं वाटत नाही. कदाचित म्हणूनच मी भूतकाळात दुखावले गेले”, असे दीपिकाने म्हटले.

“पहिल्यांदा जेव्हा त्याने माझी फसवणूक केली, तेव्हा मला वाटले की या नात्यात किंवा माझ्यात काहीतरी चूक आहे. पण जेव्हा एखाद्याला याची सवय होते तेव्हा तुम्हाला कळते की समस्या त्याच्याबाबत आहे. मी माझ्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते आणि तरीही मी त्याला दुसरी संधी दिली. हा माझा मूर्खपणा होता”, असे दीपिकाने सांगितले.

“मीच मूर्ख होते की मी त्याला दुसरी संधी दिली. कारण तो माझ्याकडे भीक मागत होता. माझ्या आजूबाजूचे लोक मला सांगत होते की तो अजूनही भटकत आहे. तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवायची. पण त्यानंतर मी त्याला रंगेहाथ पकडले. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला.” असेही दीपिकाने सांगितले.

प्रियंका चोप्राने ‘या’ अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करण्यास दिला होता स्पष्ट नकार, म्हणाली…

रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोण ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटादरम्यान एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये रंगायच्या. रणबीर आणि दीपिका यांची जोडी सिनेसृष्टीत लोकप्रिय होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाला आणि ते विभक्त झाले.

Story img Loader