बॉलीवूड अभिनेत्री या हॉलीवूडमध्येही पदार्पण करत असल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. नुकतीच दीपिका पादुकोण ही’फास्ट अॅण्ड फ्युरियस’च्या सिरीजमध्ये काम करणार असल्याची बातमी होती. पण, ‘राम लीला’शी वचनबद्ध असल्यामुळे तिने या चित्रपटात काम करणे नाकारले.
दीपिका म्हणाली की, मला याचे अजिबात दुःख नाही. भारतात मला ‘राम लीला’मध्ये काम करायचे होते आणि हे काम मी मध्येच सोडू शकत नव्हते. या चित्रपटाचे काम पूर्ण करणे ही माझी जबाबदारी होती. ज्याप्रकारे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळाली आहे ते बघता माझी मेहनत फळास आल्याचे मला वाटते. हॉलीवूड चित्रपटांमध्ये मला काम करायला आवडेल. हॉलीवूड चित्रपट करण्यामागेही माझे तेच कारण असेल जे बॉलीवूडसाठी आहे, असेही ती म्हणाली.
हॉलीवूडमधील चित्रपटामध्ये छोटी भूमिका करण्यास आवडेल का? असे विचारले असता, छोट्या भूमिका असे काही नसते. भूमिकेने लोकांवर छाप महत्वाचे आहे. भूमिका छोटी किंवा मोठी नसते. एक चांगला कलाकार छोट्याश्या भूमिकेनेही त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असल्याचे सांगत दीपिकाने छोट्या भूमिकांसाठी आपली पसंती दर्शवली.
हॉलीवूडमध्ये छोटी पण महत्वाची भूमिका हवी..
बॉलीवूड अभिनेत्री या हॉलीवूडमध्येही पदार्पण करत असल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत.

First published on: 09-12-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone open to doing small but meaty roles in hollywood