नवीन वर्षांच्या सुरुवातीचे दोन महिने म्हणजे चित्रपट पुरस्कार सोहळ्यांनी भारलेले आणि म्हणूनच छोटय़ा-मोठय़ा भांडणांनी गाजणारे दिवस, अशीच बॉलीवूडची व्याख्या आहे. पुरस्कार सोहळ्यांच्या व्यासपीठावर चांगले बोलले तरी त्यावरून वाद होऊ शकतो आणि वाईट बोलले गेले तर जणू वादाची ठिणगीच पडते.. या वर्षी तर या वादाची सुरुवात दीपिका पदुकोणपासून झाली आहे. नुकत्याच झालेल्या २१ व्या ‘वार्षिक लाइफ ओके स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्यात ‘पॉप्युलर चॉइस अॅक्ट्रेस’चा पुरस्कार घेताना दीपिकाने हा पुरस्कार ‘क्वीन’ फेम कंगनाला समर्पित केला आणि इथूनच नव्या वादाची सुरुवात झाली. दीपिकाची कंगनास्तुती कशी खोटी आहे, अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.
‘स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना दीपिकाने गेले वर्ष खरेतर कं गना राणावतचे आहे, असे विधान केले. कंगनाचा ‘क्वीन’ चित्रपट आपण पाहिला. तिने अप्रतिम काम के ले आहे, अशा शब्दांत कंगनाची स्तुती करत दीपिकाने हा पुरस्कार कंगनासाठी आहे, असे जाहीरपणे सांगितले. मात्र, दीपिकाच्या या वक्तव्यावरून आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कं गनाने आपल्याला पुरस्कारांमध्ये रस नाही, असे सांगून पुरस्कार सोहळ्यांपासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. आमिरप्रमाणेच कंगनाने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या वर्षी दोघांचेही चांगले चित्रपट येऊनसुद्धा त्यांना पुरस्कारांपासून दूर ठेवले जाते, असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे साहजिकच हे पुरस्कार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पारडय़ात पडले आहेत. त्याचाच आधार घेऊन दीपिकाने पुरस्कारांमधला पोकळपणा सिद्ध क रण्यासाठी कंगनाची स्तुती केली असावी. तसे असेल तर दीपिकाने पुरस्कार स्वीकारावाच का, असा सवाल केला जात आहे. खुद्द कंगनानेही दीपिकाच्या या वक्तव्यावर उत्तर देताना कधीतरी दीपिकाने आपल्याला वैयक्तिकरीत्याही आपल्या कामाबद्दल सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आपले फारसे समाधान न झाल्याचेच स्पष्ट केले आहे. या सगळ्या प्रकारात पुन्हा एकदा दीपिकाची कंगनास्तुती हाही नेहमीप्रमाणे तिच्या प्रसिद्धितंत्राचाच भाग असावा, अशी टीका तिच्यावर केली गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा