दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर हे इम्तियाझ अलीच्या ‘तमाशा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला गेले आहेत. दुसरीकडे, रणबीरची तथाकथित प्रेयसी कतरिना कैफही अभिषेक कपूरच्या ‘फितूर’ चित्रपटाचे चित्रीकरण कश्मीरमध्ये करत आहे. दरम्यान, मिड-डेत दिलेल्या वृत्तानुसार कतरिनाने आपल्या कामातून वेळ काढून रणबीरची दिल्लीत भेट घेतल्याचे कळते. मात्र अभिषेक कपूरने ‘फितूर’च्या चित्रीकरणादरम्यान रणबीरला कतरिनास भेटण्यास मज्जाव केला होता. पण सतत आपापल्या कामात व्यस्त असलेले हे प्रेमीयुगुल एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळालेली संधी दवडू देत नसल्याचे चित्र आहे.

Story img Loader