deepika-ranveer03तरुण चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकार जोड्यांविषयी सर्व काही जाणून घ्यायला आवडत असल्याचे अनेकवेळा दिसून येते. त्यात जर ती जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची असेल तर त्यांचा यातील रस अधिकच वाढतो. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान आपल्याला आलेल्या नैराश्याबाबत विधान करून एकच खळबळ ऊडवून देणारी दीपिका आणि रणवीर २१ मार्च रोजी करिम मुरानीच्या वाढदिवसाला एकाच गाडीतून आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र वावरताना त्यांच्यात कमालीची सहजता होती. पांढऱ्या पोषाखातील दीपिका अतिशय सुंदर दिसत होती, तर हाताला दुखापत झालेला रणवीर राखाडी रंगाच्या टीशर्टमध्ये त्याच्या नेहमीच्या कूल अवतारात होता. आपल्यात केवळ मैत्रीपूर्णसंबंध असल्याचे सांगणारी ही जोडी अनेकवेळा एकत्र वावरताना आढळून आली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र दिसलेली ही जोडी पुन्हा एकदा भन्साळी यांच्याच ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक चित्रपटात नजरेस पडेल.
deepika-ranveer02

Story img Loader