इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी बॉलिवूडमधल्या बहुचर्चित जोडीच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडत आहे. मंगळवारी अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा संगीत सोहळा पार पडला. या शानदार सोहळ्याचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आले नाहीत. पण गायिका हर्षदीप कौरने या संगीत सोहळ्याला चार चाँद लावले होते. इटलीसाठी रवाना होताना हर्षदीपने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दीप-वीरचा संगीत आणि मेहंदी कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला. यावेळी हर्षदीपने कबीरा, दिलबरो, मनमर्जियां यांसारखी बॉलिवूड सुपरहिट गाणी गायली. इतकंच नव्हे तर स्वत: रणवीरने दीपिकासाठी खास गाणं गायल्याचं कळतंय. आज (बुधवारी) हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. दीपिका – रणवीर पारंपारिक कोकणी आणि सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे.

आज कोकणी पद्धतीने तर उद्या सिंधी पद्धतीने विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं समजतंय. या विवाहसोहळ्याला कोणालाही मोबाइल फोन वापरण्याची परवानगी नाही. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी दीप- वीरने लग्नासाठी बरीच तयारी केली आहे. बॉलिवूडमधल्या या खास लग्नाची उत्सुकता सर्वांनाच आहे. इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका वीर लगेचच मुंबईत परतणार आहे. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.