शाहिद कपूर आणि रणबीर कपूर यांच्यानंतर बॉलीवूडमधील अजून एक बॅचलर म्हणजेच रणवीर सिंग हादेखील लग्नासाठी सज्ज झालेला दिसतोय. प्रेयसी दीपिका पदुकोणसह रणवीर पुढच्यावर्षी लग्नाच्याबेडीत अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, या दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली असून पुढीलवर्षी या दोघांच्या नात्यावर मोहर लागेल. पुढीलवर्षी हे साखरपुडा करण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, रणवीर आणि दीपिका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालदीवला गेले होते. दीपिकाने आपला वाढदिवसही तिथेच साजरा केला. त्यानंतर हे दोघंही थेट बंगळुरुला पोहोचले होते. दोघं कित्येक वेळा एकत्र दिसले. मात्र, या दोघांनीही अद्यापपर्यंत आपल्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिलेली नाही. भलेही दोघ आपल्या संबंधांबाबत बोलत नसले तरी त्यांचे इतकेवेळा एकत्र दिसणेचं त्यांच्या प्रेमसंबंधांची कबुली देते.
शाहिद, रणबीरनंतर रणवीरही बोहल्यावर?
शाहिद कपूर आणि रणबीर कपूर यांच्यानंतर बॉलीवूडमधील अजून एक बॅचलर म्हणजेच रणवीर सिंग हादेखील लग्नासाठी सज्ज झालेला दिसतोय.
First published on: 16-06-2015 at 02:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone ranveer singh to get engaged in february