शाहिद कपूर आणि रणबीर कपूर यांच्यानंतर बॉलीवूडमधील अजून एक बॅचलर म्हणजेच रणवीर सिंग हादेखील लग्नासाठी सज्ज झालेला दिसतोय. प्रेयसी दीपिका पदुकोणसह रणवीर पुढच्यावर्षी लग्नाच्याबेडीत अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, या दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली असून पुढीलवर्षी या दोघांच्या नात्यावर मोहर लागेल. पुढीलवर्षी हे साखरपुडा करण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, रणवीर आणि दीपिका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालदीवला गेले होते. दीपिकाने आपला वाढदिवसही तिथेच साजरा केला. त्यानंतर हे दोघंही थेट बंगळुरुला पोहोचले होते. दोघं कित्येक वेळा एकत्र दिसले. मात्र, या दोघांनीही अद्यापपर्यंत आपल्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिलेली नाही. भलेही दोघ आपल्या संबंधांबाबत बोलत नसले तरी त्यांचे इतकेवेळा एकत्र दिसणेचं त्यांच्या प्रेमसंबंधांची कबुली देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा