गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगलीये ती म्हणजे दीपिका- रणवीर या जोडप्याची. लग्नानंतर दोघांनी आज मुंबईत दुसऱ्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी 8 वाजेपासून मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू आहे. या रिसेप्शनपार्टीत दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातलग, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अन्य क्षेत्रातील निवडक मंडळी उपस्थित आहे.
या रिसेप्शन पार्टीतील काही खास फोटो समोर आले आहेत. व्हाइट आणि गोल्डन रंगाच्या साडीत दीपिका आणि त्याच रंगाचा शेरवानी रणवीरने घातलेला दिसतोय. फॅशन डिझायनर अबू जानी-संदिप खोसला यांनी दोघांचेही कपडे डिझाइन केलेत.
एखाद्या शाही जोडप्याप्रमाणे दोघंही दिसत आहेत. यानंतर 1 डिसेंबर रोजी दोघांनी अजून एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं असून या पार्टीत बॉलिवूडमधील त्यांची मित्रमंडळी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. यापूर्वी 21 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूत पहिली रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. इटलीत 14 नोव्हेंबर रोजी दोघंही लग्नाच्या बेडीत अडकलेत.