बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बुधवारी मेहंदी आणि आज हळद या विधी पूर्ण झाल्या असून लवकरच हे दोघं बोहल्यावर चढणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नावर आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात आता रणबीरची पूर्वश्रमीची प्रेयसी अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही भर पडली आहे. दीपिकानंही आता या दोघांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया आणि रणबीर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पुष्टी करणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. अयाननं त्याच्या चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना आलिया आणि रणबीर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. याच व्हिडीओवर दीपिकानं प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- “सर्वच गोष्टी लक्ष वेधण्यासाठी…” आंबेडकर जयंतीच्या पोस्टवरून टीका करणाऱ्याला हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

अयान मुखर्जीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. या व्हिडीओवर रणबीरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकानं प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकानं अयान मुखर्जीनं शेअर केलेला हा व्हिडीओ लाइक करत या दोघांच्या लग्नाबाबत आनंद व्यक्त केला आहे. अर्थात दीपिकानं या दोघांच्या लग्नावर कोणत्याही प्रकारची कमेंट केलेली नाही. मात्र तिने ही पोस्ट लाइक करणं तिनं रणबीर- आलियाला शुभेच्छा दिल्याचं मानलं जातंय.

आणखी वाचा- Video : आलिया सर्वांसमोर रणबीरसोबत असं वागली की सगळीकडे झाली होती चर्चा

दरम्यान रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी २००७ साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघांची ओळख ‘बचना ऐ हसीनों’च्या सेटवर झाली होती. मात्र काही वर्षांतच दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एंट्री झाल्यानंतर दीपिका आणि रणबीरमध्ये दुरावा आल्याचंही बोललं जातं. दरम्यान दीपिकानं २०१९ मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली. तर आता रणबीर कपूर आलियासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone reacts on ayan mukherji video for alia bhatt and ranbir kapoor wedding mrj