दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंच दीपिका पदुकोणने एका मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने अभिनेत्री कतरिना कैफबद्दलही भाष्य केले.

दीपिका पदुकोणने ‘गहराइयां’ चित्रपटाच्या निमित्ताने एनडीटीव्हीला मुलाखत दिली. त्यावेळी तिला सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल विचारण्यात आले. यावेळी ती म्हणाली, “मी आणि कतरिना आम्ही दोघींनीही चुकांमधून बरेच काही शिकलो आहोत. मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे पीआर एजंट किंवा मॅनेजर नव्हता. मी स्वतःचा मेकअप स्वत: करायची, केसांची स्टाईलही स्वत: करायचो. तेव्हा मी माझे कपडेही स्वत:च ठरवायची.”

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”

“मी आणि कतरिना कैफ त्या मोजक्या लोकांपैकी आहोत, ज्यांनी सिनेसृष्टीतील दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत. पहिली म्हणजे जिथे आपल्याकडे काहीच नव्हते आणि दुसरे जेव्हा ते सर्व आमच्याकडे यायला लागल्यावर आम्ही त्याचा स्विकार केला,” असेही ती म्हणाली.

यापुढे दीपिका म्हणाली, “आताची मुलं-मुली पूर्णपणे तयार आहेत. त्यांना कसे उभे राहायचे ते सांगितले जाते. कसे बसायचे, स्वतःला कसे ठेवायचे, कुठे काय बोलावे, काय बोलू नये, काय घालावे, काय घालू नये, हेअरस्टाईल, मेकअप कसा करावा याबद्दल सांगितले जाते. ही एक चांगली गोष्ट आहे, असे मला वाटते.”

“आमच्याकडे हे सर्व नव्हते. आम्ही काही काळानंतर त्या गोष्टी पाहिल्या. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. पण मी एका अर्थाने फार आनंदी आहे, कारण यामुळे तुम्ही कोण आहात? हे तुम्हाला समजते”, असेही दीपिकाने म्हटले.

“हा माझा…”, आई-बाबा झाल्यानंतर तब्बल महिनाभराने प्रियांका आणि निकचे एकत्र ‘लाँग ड्राईव्ह’

दरम्यान दीपिकाचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केलं आहे. दीपिका लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader