बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. दीपिका पदुकोण ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तिच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे तिला हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रोजेक्ट के’ नावाच्या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान दीपिकाला अचानक अस्वस्थ वाटण्यास सुरुवात झाली. दीपिकाचा रक्तदाब वाढल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. तिच्या विविध चाचण्याही करण्यात आल्या. यानंतर तिला एक दिवस आराम करण्यास सांगण्यात आले होते.

काल संपूर्ण दिवस आराम केल्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे नुकतंच दीपिकाने या चित्रपटाच्या शूटींगला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.

दीपिका पदुकोण ही सध्या हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटात दीपिका आणि प्रभास ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चनही झळकणार आहेत.

दरम्यान दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. लवकरच ती अभिनेता शाहरुख खान सोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिक रोशन सोबत ‘फायटर’मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone rushed to a hospital in hyderabad after increased heart rate returns to sets after treatment nrp