एकमेकांशी प्रेमाचे नाते जरी टिकू शकले नाही तरी बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी आपली मैत्री मात्र कायम ठेवली. ब्रेकअपनंतर एकत्र चित्रपटात काम केलेल्या आणि करणाऱ्या बऱ्याच जोड्या कलाविश्वात आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचीही जोडी अशीच काहीशी आहे असं म्हणायला हरकत नाही. हे दीपिकाने इन्स्टाग्रामवर नुकतंच शेअर केलेल्या एका फोटोवरून दिसून येतं.
जागतिक फोटोग्राफी दिवसानिमित्त (World Photography Day) दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती रणबीरचा फोटो काढताना दिसत आहे. हा फोटो ‘तमाशा’ या चित्रपटातील आहे. खरंतर ब्रेकअपनंतरच या दोघांनी ‘तमाशा’चं शूटिंग केलं होतं.
https://www.instagram.com/p/Bmp0fM6hhk7/
एकीकडे दीपिका अभिनेता रणवीर सिंगसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तर दुसरीकडे रणबीर आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे दोघंही नव्या नात्यात गुंतले असताना आपली मैत्री जपल्याचं पाहायला मिळत आहे. दीपिकाने रणवीरसोबतचा फोटो शेअर करण्याऐवजी रणबीरसोबतचा का केला, असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला.