करण जोहरने ‘शुद्धी’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाबाबत काहीनाकाही बातमी कानावर पडतंच आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकारांची निवड हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. आता या चित्रपटात दीपिका पदुकोणची मुख्य भूमिकेसाठी वर्णी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
‘अग्निपथ’ चित्रपटाने प्रसिद्धिस आलेला करण मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी शुद्धीमध्ये हृतिक रोशन आणि करिना कपूर हे दोघे काम करणार होते. मात्र, काही कारणास्तव दोघांनीही चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांची या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा अपूर्णच राहणार आहे. हृतिकच्या जागी रणवीर सिंगची निवड करण्यात येणार असल्याचीही धुसफूस चालू आहे. पण रणवीरच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इतकेच नाही तर हृतिकसुद्धा बहुतेक हा चित्रपट स्वीकारू शकतो, अशीही चर्चा सुरु आहे. ‘शुद्धी’ची कथा पूनर्जन्म प्रेमकथेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘शुद्धी’मध्ये दीपिकाची वर्णी
करण जोहरने 'शुद्धी' चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाबाबत काहीनाकाही बातमी कानावर पडतंच आहे.
First published on: 21-03-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone signed for shuddhi after kareena kapoor walks out