बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर यांच्यात प्रेमप्रकरण असल्याची बरीच चर्चा सध्या चालू आहे. दोघे नेहमीसोबत दिसतात. दीपिकाने तिचा २८वा वाढदिवससुध्दा रणवीर सिंहसोबत साजरा केला.
दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे. पण, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, या दोघांचे एकत्र असलेली छायाचित्रे पाहता त्यांच्यात जवळीक वाढत आहे, असे वाटते.
दीपिकाने कुटुंबाशिवाय आणि मित्रांशिवाय रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये एक पार्टी केली. परंतु या पार्टीविषयी कोणालाच काही माहीत नाही. सर्व धावपळीच्या जीवनापासून दूर जाऊन दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. दीपिका आणि रणवीर न्यूयॉर्कमधील चेलसी मार्केटमध्ये दिसले.