एफएसएम मासिकातर्फे घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात अभिनेत्री दीपिका पदुकोन ही जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवडली गेली आहे. 
मासिकाच्या आगामी अंकाच्या मुखपृष्ठावर दीपिका झळकणार असून प्रकाशनही तिच्याच हस्ते करण्यात येणार आहे. तसेच या यादीतील इतर १०० महिलांबाबतही या अंकात माहिती असेल.
दरम्यान, या सर्वेक्षणात कामाची दखल घेतली गेली असून त्याचा माझ्या दिसण्याशी कोणताही संबंध नाही, असं दीपिकाला वाटतं. अशाप्रकारचा सन्मान ही माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या शरीरयष्टीचा यामध्ये काहाही संबंध नाही. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या प्रकारचे चित्रपट करता, त्यावरूनच विशिष्ट वस्तूच्या जाहिराती तुम्हाला मिळत असतात, असंही ती पुढे म्हणाली.
गेल्या दोन-तीन वर्षात मी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. हा सन्मानसुध्दा त्या यशाचा आणि मी केलेल्या भूमिकांवरच्या विश्वासाचा आहे, असंही ती म्हणाली.
होमी अदाजानियाचं दिग्दर्शन असलेल्या आगामी ‘फाइंडींग फॅनी’ चित्रपटातील तिचा लूकही नुकताच प्रसिध्द झाला आहे. या चित्रपटात अंजली पाटील, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, पंकज कपूर, नसिरुद्दीन शाह आणि डिंपल कपाडिया यांच्याही भूमिका आहेत. 
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा