बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि आलियाच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. रणबीर बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोन. दीपिकाने तर रणबीरसाठी टॅट्यू देखील काढला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाला आणि ते विभक्त झाले.
रणबीर आणि दीपिका आज चांगले मित्र असले तरी देखील ब्रेकअपनंतर ते दोघे एकमेकांच तोंड बघणं देखील पसंत करत नव्हते. त्या दोघांचा जेव्हा ब्रेकअप झाला होता. तेव्हा त्या दोघांनी एकमेकांनीविषयी अनेक वक्तव्यं केली होती. एवढचं काय तर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. या सगळ्यानंतर रणबीर बहीण करीनासोबत करण जोहरच्या शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा रॅपिड फायर राऊंड दरम्यान, रणबीरने दीपिकाला स्वार्थी मुलगी असल्याचे म्हटले होते. तर दीपिकाने त्याला कंडोम भेट देण्याविषयी बोलली होती आणि यात तिला साथ दिली होती सोनम कपूरने.
आणखी वाचा : भुवन बामने लावली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी!
खरतरं, रणबीरने सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात रणबीरसोबत सोनम होती आणि ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते असे म्हटले जाते. तर दीपिकाने जेव्हा करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी रॅपिड फायर दरम्यान, दीपिकाला विचारण्यात आलं की रणबीरला भेट म्हणून काय दिलं पाहिजे तर तेव्हा ती म्हणाली होती कंडोमचं पॅकेट.
आणखी वाचा : कपिल शर्मा एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतो इतके पैसे, अभिनेत्याचा खुलासा
त्यानंतर शोमध्ये जेव्हा रणबीरने हजेरी लावली होती. तेव्हा त्याला एक्स-गर्लफ्रेंड दीपिकाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रणबीरने दीपिकाच्या कंडोमच्या गोष्टीवर उत्तर दिले होते. यावेळी स्वार्थी मुलगी कोण आहे असा प्रश्न विचारता त्याने लगेच दीपिकाचे नाव घेतले आणि त्यानंतर सोनम कपूरचे.