दीपिकाचा तथाकथित प्रियकर रणवीर सिंग हा आगामी ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असूनही ती रणवीरच्या भूमिकेविषयी अनभिज्ञचं आहे.
होमी अदजानियाच्या ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये रणवीरने दीपिकाच्या मृत पतीची भूमिका साकारली आहे. याबद्दल दीपिकाला विचारले असता तिने सहकलाकार अर्जुन कपूरला याचे उत्तर देण्यास सांगितले. ती म्हणाली, तुम्ही याला हा प्रश्न विचारा मला नको. यावर अर्जुन म्हणाला, जास्त विचार न करता जेव्हा कलाकार पाहुण्या कलाकाराची भूमिकेस तयार होतात तेव्हा खूप चांगले वाटते. होमीने रणवीरला भूमिकेबद्दल विचारणा केली होती आणि ज्या पद्धतीने त्याने रणवीरला त्याच्या भूमिकेबाबत सांगितले ते बहुतेक त्याला (रणवीर) आवडले. त्यामुळेच त्याने पाहुणा कलाकार म्हणून चित्रपटात येण्यास होकार दिला. तसेच, रणवीरच्या भूमिकेबद्दल दीपिकाला काहीच माहित नसल्याचे दिग्दर्शक होमी अदजानियाने सांगितले. विशेष म्हणजे सदर भूमिकेसाठी रणवीरने मानधनही घेतलेले नाही.
संजय लीला भन्साळीच्या राम लीला चित्रपटानंतर त्याच्याच बाजीराव मस्तानीमध्ये रणवीर-दीपिका ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

Story img Loader