अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचा आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. या ऍक्शन कॉमेडी चित्रपटात दीपिका बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानबरोबर दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात एका व्यक्तीची मुंबई ते रामेश्वरमपर्यंतची यात्रा आणि या यात्रेदरम्यान होणा-या घटना पाहायला मिळणार आहेत. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चे शूटिंग पूर्ण झाल्याचे दीपिकाने ट्विटरवर म्हंटले आहे. दीपिका तिस-यांदा शाहरूख खानसोबत अभिनय करीत असून या आधी त्यांनी ‘बिल्लू’ आणि ‘ओम शांति ओम’ या दोन चित्रपटांत एकत्र काम केले आहे. पुढील आठवड्यात दीपिकाचा ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपट प्रदर्शित होत असून, यात ती रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone wraps up shooting with shah rukh khan