अशाचं काहीशा वैयक्तिक प्रश्नाचा मारा बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणवर करण्यात आलेला. मात्र, यावेळी दीपिकाने अजिबात वेळ न दवडता माध्यमांना त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर देऊन सर्वांना गप्प केले.
दीपिकाचा ब्लॉग : स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग हा बातमीचा विषय नाही
दीपिकाच्या मानेवर आरके असे इंग्रजीत लिहलेला टॅटू आहे. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेल्या रणवीर कपूरच्या नावाच्या आद्याक्षरांचा हा टॅटू आहे. त्यावर एका पत्रकाराने दीपिकाला विचारले, तुझ्या या आरके टॅटूबद्दल रणवीर सिंग काय विचार करतो? यावर रागावलेल्या दीपिकाने सदर पत्रकाराला कडक उत्तर दिले. का? देशाला का जाणून घ्यायचे आहे? जे तुम्हाला माहितचं नाही, या अर्नब गोस्वामीच्या स्टाइलमध्ये दीपिकाने पत्रकाराचा समाचार घेतला.
वादग्रस्त ट्विटविरोधात दीपिकाचा रुद्रावतार
यापूर्वी, क्लिवेज वादावर दीपिकाने ‘हो मी स्त्री आहे. मला स्तन आहेत. तुम्हाला काही आक्षेप आहे का?’ या शब्दातं माध्यमांना सुनावले होते.