बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या मैत्रिणीच्या लग्नासाठी श्रीलंकेत गेली असून, दीपिकाचा तथाकथीत प्रियकर रणवीर सिंगदेखील या लग्नसोहळ्यास उपस्थित होता. या दोघांनी लग्नसोहळ्यादरम्यान नृत्याची झलक सादर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


या दोन्ही कलाकारांनी ‘बलम पिचकारी’ आणि अन्य बॉलिवूड गाण्यांवर नृत्य केले. समाज माध्यमावरील व्हिडिओत दीपिका आणि रणवीर नृत्याचा आनंद घेतना दिसतात. दीपिकाने सफेद रंगाचा शरारा तर रणवीरने काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसून येतो.
जिवलग मैत्रिणीच्या लग्नासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण शूटिंगमधून वेळ काढत कॅनडाहून थेट श्रीलंकेत दाखल झाली. या लग्नसोहळ्यात दीपिका आणि रणवीर एकत्र दिसल्याने त्यांच्यातील जवळकीबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika ranveer dance to balam pichkari gallan goodiyaan at her friends wedding