बॉलीवूडची हॉट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने ‘राम लीला’ चित्रपटात दमदार काम केले. या दोघांमधली केमिस्ट्रीने रुपेरी पडद्यावर आग लावली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. राम लीलामधील भूमिकेला चांगली पसंती मिळाली. असे असतानाही दीपिकाची बहिण अनिषावर तो जादू चालवू शकला नाही.
तर, दीपिकाचा तथाकथिक प्रियकर रणवीर सिंगसाठी काही चांगली बातमी असल्याचे दिसत नाही. अनिषा पादुकोण ही रणवीर सिंगची नाही तर रणबीर कपूरची चाहती आहे. हौशी गोल्फ खेळाडू अनिषा पादुकोणने नुकतेच आपल्याला रणबीर कपूर आवडत असल्याचे ट्विटरवर सांगितले. अनिषाची चाहती माशल हुसैनने केलेले ट्विट:



या ट्विटवरून तरी दोन्ही पदुकोण भगिनींची पसंती वेगवेगळी असल्याचे दिसते. एकीला रणवीर तर दुसरीला रणबीर आवडतो.

Story img Loader