यंदाच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारावर भारतीय कलाकारांनी छाप सोडली आहे. ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं सर्वोत्कृष्ट ड्रामा या विभागात पुरस्कार पटकावला आहे. या विभागात ‘बेटर कॉल सोल’, ‘द किलिंग ईव्ह’, ‘द क्राऊन’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ यांसारख्या अनेक सुपरहिट वेब सीरिजमध्ये स्पर्धा होती. परंतु या स्पर्धेत ‘दिल्ली क्राईम’नं बाजी मारत विजेता पद पटकावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणं अनेक कलाकारांचं स्वप्न असते. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकारांचं जगभरातून कौतूक केलं जातं. या पार्श्वभूमीवर एका भारतील वेब सीरिजनं एमी पुरस्कार पटकावणं नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शक रिची मेहता यांनी ‘दिल्ली क्राईम’ची निर्मिती केली होती. अभिनेत्री शेफाली शाह हिने या सीरिजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ही सीरिज २०१२ साली झालेल्या एका गँग रेपवर आधारित आहे.