Paresh Rawal takes a dig at Sonia Gandhi Rahul Gandhi Delhi Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या पदरी मात्र निराशा पडल्याचे पाहायाला मिळत आहे. विधानसभा निवडणूक मतमोजणीत ताज्या आकडेवारीनुसार भाजपा ४८ जागांवर आम आदमी पक्ष २२ जागांवर विजयी झाला आहे. तर तिसरा मोठा पक्ष काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यादरम्यान अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर या निवडणूक निकालाची जोरदार चर्चा होत आहे. यादरम्यान एका एक्स यूजरने एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये “राहुल गांधी मानवी इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यापासून काही तास दूर आहेत. १०० वा यशस्वी अपयश. या ऐतिहासिक घटनेचा भाग झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन”, असे म्हटले आहे. दरम्यान ही पोस्ट पुन्हा शेअर करत रावल यांनी एका आईचं दु:ख लक्षात घ्या. ना सून मिळतेय ना बहुमत (एक माँ का दर्द समझो । ना बहू मिलती हैं और ना ही बहूमत मिलता हैं ।) अशी खोचक टिप्पणी केली आहे.

अरविंद केजरीवाल पराभूत

दरम्यान देशाची राजधानी दिल्लीतील जनेतेने सत्तांतर घडवून आणले आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले असून गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ‘आप’ला त्यांनी नाकारलs आहे. भाजपाने ४८ जागांवर विजय मिळवला असून आपने २२ जागा आपल्या जिंकल्या आहेत. तर २०१५ च्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा मिळवणाऱ्या भाजपाने दहा वर्षांत जोरदार मुसंडी मारून सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत आपचे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांचा विजय झाला आहे.