रॅपर आणि सिंगर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार (Honey Sing and Shalini Talwar) या दोघांचा १२ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. हनी सिंगचा घटस्फोट (Divorce) दिल्लीच्या कुटुंब न्यायलायने मंजूर केला आहे. शालिनी तलवारने पती हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence) केल्याचे आरोपही केले होते. कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचं अडीच वर्षांपूर्वीचं घटस्फोटाचं प्रकरण निकाली काढत दोघांनाही घटस्फोट मंजूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शालिनी तलवारचे हनी सिंगवर आरोप

हनी सिंगची पत्नी शालिनी म्हणाली होती की हनीने मला मारहाण केली आहे. तसंच माझ्या कुटुंबावर त्याने मानसिक आणि भावनिक आघात केले आहेत. तसंच माझ्या कुटुंबाकडून पैसेही उकळले आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हनी सिंगने त्याची पत्नी शालिनी तलवारला १ कोटींचा डिमांड ड्राफ्टही सोपवला होता.

शालिनी तलवार आणि हनी सिंग हे दोघंही शाळेत असल्यापासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिल्लीच्या गुरुनानक पब्लिक स्कूलमध्ये दोघंही शिकायला होते. शालिनीला पाहता क्षणी हनी सिंग तिच्या प्रेमात पडला होता. शाळेत असल्यापासूनच दोघं एकमेकांना ‘डेट’ करत होते. मात्र त्यांनी जगापासून हे नातं तेव्हा लपवून ठेवलं होतं. बार अँड बेंचने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

या दोघांचं लग्न कसं झालं?

२०११ मध्ये या हनी सिंग आणि शालिनी तलवार या दोघांनी दिल्लीच्या एका गुरुद्वारामध्ये शीख रिती रिवाजांनुसार लग्न केलं. दोघांच्या कुटुंबांच्या उपस्थितीत हे लग्न अत्यंत गुपचूप पद्धतीने पार पडलं. हनी सिंग आणि शालिनी तलवार या दोघांचं लग्न झाल्याची माहितीही कुणाला मिळाली नाही. या दोघांच्या लग्नानंतर तीन वर्षांनी दोघांचं अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र हनीने एका रिअॅलिटी शोमध्ये आपण लग्न केल्याचं सांगितलं होतं तेव्हा त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता हनी सिंगचं १२ वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi family court grants divorce to singer honey singh his wife shalini talwar 12 years relationship ends scj