पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. याच ‘मन की बात’चा आज १०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. या भागामध्ये त्यांनी काही खास व्यक्तींशी संवाद साधला. नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचे कौतुक केले आहे.
‘मन की बात’ हा कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी रेडिओच्या माध्यमातून संवाद साधतात. या संवादाचा १०० वा कार्यक्रम दणक्यात पार पडला. नुकतंच अमृता फडणवीस यांनी त्यांची लेक दिविजाबरोबर हा कार्यक्रम ऐकला. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत.
आणखी वाचा : विश्लेषण : ‘मन की बात’चे शतक : जगभरातील नेत्यांच्या जनसंवादाच्या कुळकथा काय आहेत?
“दिविजाबरोबर ‘मन की बात’चा आजचा ऐतिहासिक १०० वा भाग पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जगातील एकमेव असे अद्भूत नेते आहेत ज्यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून कोट्यावधी लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्याद्वारे अनोळखी लोकांना ओळख मिळवून दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या या कार्याला सलाम”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर प्राजक्ता माळीच्या भाचीने ठरला ठेका, म्हणाली “नाच येत नसेल…”
‘मन की बात’च्या १०० व्या कार्यक्रमासाठी मुंबई भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. शहर आणि उपनगरात पाच हजाराहून अधिक ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी अकरा वाजता करण्यात आले. ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकण्याासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. विलेपार्ले येथे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.