उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या प्रत्येक विषयावर आपलं परखड मत मांडतात. यामुळे त्या कधी कधी ट्रोलही खूप होतात. नुकतीच अमृता फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हॅशटॅग फ्रायडे वाइब्स आणि फ्रायडे फिलिंग लिहित अमृता फडणवीस यांनी “सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे,” असं लिहिलं आहे. तसेच याबरोबर त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये त्यांनी हातावर घोरपड घेतलेली दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी दोन्ही हातात साप पकडले आहेत.

हेही वाचा – ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण कसं झालं दाखवतेय राखी सावंत; व्हिडीओ झाला व्हायरल, नेटकरी संतापून म्हणाले, “निदान…”

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा जलवा कायम! दुसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, एकूण कमाई…

अमृता फडणवीसांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. एक नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “सध्या एक माणूस महाराष्ट्रात विषय पसरवतोय, ते किती जहाल आहे ते दिसतंयच. एक दिवस ते विषय त्यालाच डसेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “मी काय म्हणतो, संजय राऊत यांच्याकडे आपलाच साप गेला होता की काय?” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “माणूस नावाच्या प्राण्यांपेक्षा हे बरेच… माणूस पुन्हा येण्यासाठी किती विषारी बनू शकतो हे महाराष्ट्र बघतोय.” तर चौथ्यानं नेटकऱ्यानं लिहिलं की, “घरात एक साप असताना दुसऱ्या सापाची काय गरज?”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री

मिसेस फडणवीसांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टला अवघ्या काही तासांत १ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर १५०हून अधिक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.