राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस एक उत्तम गायिकाही आहेत. आजवर त्यांनी अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता अमृता नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या नवीन गाण्याचे बोल ‘आज मै मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’, असे असणार आहेत. ‘टी सीरिज’चं हे गाणं येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा>> Video: बिग बॉसने दिलेलं सरप्राइज पाहून राखी सावंत रडली, चाहते म्हणतात “हिच्या नादात प्रसादला…”
२०२३मध्ये अमृता फडणवीस त्यांचं पहिलं गाणं घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांचं हे गाणं बॅचलर्सवर आधारित असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता यांचा नवीन लूक पाहायला मिळत आहे. जीन्स, टॉप व जॅकेट परिधान करुन ज्वेलरी घालून हटके फॅशन केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या लूकमुळे चाहत्यांची गाण्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा>> ‘ये है मोहब्बते’ फेम ‘रुही’ने १५व्या वर्षी खरेदी केलं कोट्यवधींचं घर, फोटो शेअर करत म्हणाली…
अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.