उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या नवीन गाण्यामुळे सध्या चर्चेत आहेत. ‘आज में मूड बना लिया’ हे अमृता यांचं नवं गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. अमृता यांच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले.
‘आज में मूड बना लिया’ गाण्याच्या निमित्ताने अमृता यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुंबईतील रस्ते व मेट्रोबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. रॅपिड फायर खेळताना अमृता यांना “नागपूरची कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते?”, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अमृता यांनी “नागपूरची संत्री”, असं उत्तर दिलं. अमृता यांनी यावर बोलताना मुंबईतील रस्ते व मेट्रोची नागपूरशी तुलना केली.
हेही वाचा>> “…म्हणून मी चांगली आई झाले”, जिनिलीया देशमुखने मुलांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत
हेही वाचा>> “आय एम गौरव मोरे…” दुबईतही फिल्टरपाड्याच्या बच्चनची हवा; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…
अमृता पुढे म्हणाल्या, “नागपूरच्या संत्रीबरोरच तेथील रस्ते व मेट्रो मला विशेष आवडतात. नागपूरसारखे रुंद रस्ते व मेट्रो मुंबई नागरिकांना देऊ शकलेली नाही”. अमृता यांनी मुंबईबाबत केलेल्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा>> …अन् भर पार्टीत शरद केळकरला पत्नीने केलं किस, व्हिडीओ व्हायरल
अमृता या पेशाने बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनके विषयांवर त्या सोशल मीडियाद्वारे ठामपणे मतं मांडून व्यक्त होताना दिसतात.