आज सगळीकडेच धुळवड धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. कलाक्षेत्रामधील मंडळींनी विविध पार्ट्यांना हजेरी लावली आहे. तर राजकीय मंडळीही धुळवड साजरी करण्यात मग्न आहेत. अशामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीयही धुळवड साजरी करत आहेत. अमृता फडणवीस यांनी यादरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रियदर्शनीने सोडंल मौन, म्हणाली, “मैत्री वाढली आणि…”

अमृता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध सणांनिमित्त त्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसतात. आताही त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी अमृता यांनी अगदी हटके अंदाजातील व्हिडीओ शेअर केला आहे. होळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या खांद्यावर पोपट दिसत आहे.

आणखी वाचा – “हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर

या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगीही दिसत आहे. अमृता त्यांच्या मुलीसह “हॅप्पी होली” बोलत आहेत. तर दोघींच्याही चेहऱ्यावर रंग दिसत आहे. अमृता यांनी त्यांच्या मुलीचा हात हातात पकडला आहे. अमृता यांच्या खांद्यावर पोपटही बसून आहे. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

अमृता यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा”. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी अमृता यांनाही होळीच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगीही अगदी गोड दिसत आहे. या व्हिडीओला काही मिनिटांमध्ये हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader