राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच चर्चेत असतात. पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जास्तच चर्चा असते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. बँक अधिकारी, गायिका अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच अमृता फडणवीस यांनी झी मराठीवरील नुकतंच सुरु झालेल्या ‘बस बाई बस” या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोलेबाजीही केली.
झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचे काही प्रोमो झी मराठीने शेअर केले आहेत. यात विविध गंमतीजमती पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहताक्षणी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गुजरात आणि महाराष्ट्राचे संबंध…”
यावेळी अमृता फडणवीसांना राजकीय घटनांसह खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यासोबत त्यांनी गाण्याची आवड, जेवण आणि ट्रोलिंग यावरही उत्तर दिलखुलास उत्तरं दिली. या दरम्यान त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन एका म्हणीचा अर्थ विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी फार हटके पद्धतीने उत्तर दिलं.
‘बस बाई बस’ या शोमध्ये अमृता फडणवीस यांना एका म्हणीचा अर्थ विचारण्यात आला होता. ‘देर आये दुरुस्त आए’, अशी ती म्हण होती. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत आणि जे आले ते येणारच होते.” त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाले. यावेळी त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
बस बाई बस : “…तर माझ्या त्यांना शुभेच्छा”, सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारला अप्रत्यक्ष टोला
दरम्यान अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाहवा असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.