राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. हे त्यांच्या याआधी प्रदर्शित झालेल्या गाण्यांमधून दिसून आलं आहे. अमृता फडणवीस उत्तम गायिका आहेत. नुकतंच त्यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये त्या स्वतः डान्स करतानाही दिसत आहे. या गाण्याला एका दिवसातच दहा मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.
आणखी वाचा – ‘ठाकरे २’ चित्रपटाबाबत संजय राऊत यांचा खुलासा, म्हणाले, “जर एकनाथ शिंदेंवर चित्रपट येऊ शकतो तर…”
टी सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा प्रेक्षकांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. तर काहींनी मात्र अमृता फडणवीस यांना ट्रोलही केलं आहे. पण ‘मूड बना लिया’ पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय होती याबाबत अमृता यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – ‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
अमृता फडणवीस यांना या गाण्याच्या लाँचिगदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘मूड बना लिया’ गाणं पाहिलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, “हो पाहिलं. त्यांना हे गाणं खूप आवडलं.” त्यांनी या गाण्यावर स्वतः डान्स केला का? या प्रश्नावर अमृता म्हणाल्या, “ते ट्रोलिंगला घाबरले. पण त्यांना गाण्याबाबत सगळ्या गोष्टी आवडल्या. ते ज्या पदावर आहेत त्यानुसार निम्म्या लोकसंख्येकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.”
आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”
अमृता यांची काही गाणी याआधीही प्रदर्शित झाली आहेत. त्यांच्या या गाण्यांना सोशल मीडियावरही बराच प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.