राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वीच ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. त्यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. शिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं प्रदर्शित केलं. अमृता यांना गाण्याची प्रचंड आहे. त्यांनी महाशिवरात्रीनिमित्तही एक गाणं इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : “देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी…” ‘त्या’ गाण्याचा व्हिडीओ शेअर करताच अमृता फडणवीस ट्रोल

जवळपास वर्षभरापूर्वी अमृता फडणवीस यांचं ‘शिव तांडव स्तोत्र’ गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला १३ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. आता महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत त्यांनी हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच सगळ्यांना हे गाणं ऐकण्यास सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : …अन् अचानक वनिता खरातच्या घरी पोहोचला ओंकार भोजने, अभिनेत्रीला मिठी मारताना पाहून तिच्या नवऱ्याने काय केलं? पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीस व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव! सर्वांना महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा. या पवित्र दिवशी शिव तांडव स्त्रोत्र ऐका”. अमृता यांच्या या गाण्याला काहींनी पसंती दर्शवली आहे तर काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

गाणं न गाण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे. मित्रांनो, थोडं सहन करावंच लागणार, माणसांना सोडलं नाही देवांना तरी सोडा, लोकांना का त्रास देता?, तुमचा आवाजच चांगला नाही अशा कमेंटही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हे तुमचं गाणं फारच सुंदर आहे म्हणत काहींनी अमृता फडणवसी यांचं कौतुक केलं. अमृता यांनी याआधीही अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बॅंकर असलेल्या अमृता यांना गाण्याची विशेष आवड आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis share shiv tandav stotram on mahashivratri occassion watch video kmd
Show comments